शरीर छोट्या छोट्या कामाने थकायला लागते. उन्हाळ्याच्या दिवसात अशा प्रकारे अधिक थकायला होते. याचे कारण म्हणजे पाण्याची शरीरात कमतरता असणे.
शरीर थंड ठेवण्यासाठी मेंदू घामावाटे शरीरातून पाणी बाहेर टाकत असतो. अशा वेळी शरीरात पाण्याची कमतरता भासू लागते. त्याची लक्षणे शरीरात तुम्हाला दिसू लागतात. ही कातरता दूर करण्यासाठी आपल्याला योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.
दिवसभरात भरपूर पाणी पिण्याचे फायदे
तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. मेंदू आणि पाणी यांचा घनिष्ट संबध आहे. पाण्याशिवाय मेंदू कधीच काम करू शकत नाही. मेंदूचे काम चालण्यासाठी पाणी, आहार खूप महत्वाचा असतो. यासाठी आपल्याला दिवसभरात आवश्यक पाणी पिणे आवश्यक आहे. अंदाजे आपल्याला दिवसभरात ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. परंतु पावसात, हिवाळ्यात हे प्रमाण कमी होऊ शकते. मला वाटते शरीराला जेव्हा पाण्याची गरज असते, तेव्हा पाणी पिणे आवश्यक आहे.
मेंदूचे दोन भाग असतात. डावा मेंदू आणि उजवा मेंदू. यामध्ये आपण व्यावहारिक जीवनाची अधिक कामे डाव्या मेंदूच्या मदतीने करत असतो. डावा मेंदू हा भाषा, व्यवहार, संशोधन आणि अचूकपणासाठी जबाबदार असतो. यामध्ये मेंदू एक असला तरी दोन्ही बाजूच्या मेंदूचे काम परस्पर विरोधी असते. परंतु त्याचे काम एकमेकला पूरक असते.
एका रिसर्चनुसार अपुरा आणि निकृष्ट आहार विशिष्ट इन्स्पेक्शन,औषधे, स्ट्रेस, प्रदूषित वातावरण हे मेंदूच्या वाढीत अडथळे निर्माण करत असतात. मेंदूच्या उत्तम वाढीसाठी सकस आहार आणि पुरेसे पाणी पिणे अति आवश्यक आहे.
या वरील सर्व बाबीवरून तुमच्या लक्षात येईल की पाणी हा जगण्याचा स्त्रोत आहे. प्रत्येक अंगाला पाणी आवश्यक आहे. पाणी शरीरातील वातावरण समतोल ठेवण्यास मदत करते.
Read More :
शाकाहारी लोकांसाठी जवसाच्या बिया आहेत, हेल्दी फूड
स्ट्रोक म्हणजे काय? मधुमेह लोकं निरोगी जीवनशैलीने स्ट्रोकला नियंत्रित करू शकतात
चांगल्या आरोग्यासाठी कोमट पाण्याने दिवस सुरु करा
रिटायरमेंट प्लांनिंग का गरजेची आहे ?