सारांश : लेकीची ओवी | बाप लेकीची ओवी | जात्यावरच्या मराठी ओव्या
ही ओवी वाचतानाच समजते की आई-बाप आणि लेकीची ओवी आहे. ओवी म्हटलं की मनातल्या अतूट भावना आल्या. या भावना मनाला खूप भावनिक वेदना देतात. ही ओवी ही अशीच आहे.
लेकीचा जन्म होतो. आई बापाला खूप आनंद होतो. बाप तर खूपच आनंदी असतो. लेकीसाठी बाप गावभर मिठाई वाटतो. लेकीला वाढवताना बापाची तारेवरची कसरत मनाला खूप वेदना देते. खरच बाप हा बापच असतो. लेकीसाठी तर बाप हे आयुष्य भरासाठी अथांग आकाश असते. या आकाशखाली मुलगी अगदी सुरक्षित असते.
लेक मोठी होत जाते. तशी बापाला तिची आणखीनच काळजी वाटू लागते. शेवटी लेकीच्या लग्नासाठी मागणी येतात. बापाला काही सुचत नाही. परंतु शेवटी लग्नाला शिक्कामोर्तब करतो. बापाची ती लाडकी दुसऱ्याच्या हातात सोपवताना बापाला रडूच येतं. पण शेवटी मुलगी आहे. कधी ना कधी माहेरचा उंबरठा ओलांडून परक्याच्या घरी जाणारच. हे त्याने समजून घेतले.
मग लग्न निश्चित होते. तसे मुलांकडचे हुंड्यासाठी मागणी करतात. बापाकडे काहीच नसते. तरीही मुलगी सुखात राहावी म्हणून सावकाराकडचे कर्ज काढून मुलीचे थाटाने लग्न लावून देतो.
परंतु आताही बापाच्या दुखाला काही विराम होत नाही. मुलीच्या सासरचे आणखी हुंड्यासाठी मागणी करतात. बापाच्या हातात काहीच नसते. सासरचे मुलीला खूप छळतात. शेवटी कळते की मुलगी जाळून मरण पावते. काय सांगू.. काय झाली असेल अवस्था बापाची...! आईचा आक्रोश पाहून हृदय पाणी पाणी होऊन गेले. छोट्या भावाला एकुलती एक बहिण आता कधीच भेटणार नाही. रक्षाबंधनाला आता त्याला कायमची वाट पहावी लागणार.
खरच.. ही ओवी खूप काही सांगून जाते. बाप-लेकीचं हे पवित्र नातं म्हणजे नात्याची परिभाषा सांगणार नातं. एकदा ही ओवी नक्कीच वाचा आणि आपला अभिप्राय द्यायला विसरू नका.
लेकीची ओवी | बाप लेकीची ओवी | जात्यावरच्या मराठी ओव्या | Jatyavarchya Ovya
असा लेकीचा जलमं दरवळावा सुगंधानं |
पाणी लेकीच्या डोळ्याला वाहे लाटा वरी लाटा..||
वाट पाहतो बंधुराया तिची रक्षाबंधनाला..||
Read More Marathi Ovya
कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या मराठी ओव्या
आठवड्याचे वार ओवी | सात वारांची ओवी | मराठी ओव्या | Marathi Ovi