वाढत्या प्रदुषणामुळे शरीरावरती भयानक परिणाम होत आहेत. यामध्ये केस गलती अधिकांश लोकांची समस्या आहे. आजच्या काळात तर लहान वयातच केस गळणे आणि पांढरे होणे समस्या वाढली आहे. या वरती उपाय म्हणून लोकं अनेक बाहेरील उपाय करुन पाहतात. अनेक घातक केमिकल पदार्थांचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर करतात. एवढे करूनही केस गलती काय थांबत नाही. उलट असे पदार्थ लावल्याने केस गळण्याचे प्रमाण अधिकच वाढत जाते.
मित्रानों तुम्ही केस गलतीवरती अनेक उपाय केले असतील. आणि जर ते अयशस्वी झाले असतील तर, तुम्ही तुमच्या समस्याचे योग्य निदान केलेले दिसत नाही आहे. जर समस्या उद्भवली असेल तर, ती मुळापासून संपवली तरच ती नष्ट होईल. अन्यथा ती सतत तुमच्या समोर येऊन उभी राहणारच.
तुमच्या केसाच्या समस्याचे मूळ कारण पोटाची समस्या आणि योग आहार नसणे हे आहे. जर तुमचे पोट साप नसेल आणि त्या बरोबर तुम्ही प्रोटीन युक्त आहार घेत नसाल तर, तुम्हाला केस गळतीला सामोरे जावे लागणारच. मग तुम्ही बाहेरून केसांना कितीही तेल किंवा इतर गोष्टी लावल्या तरी, त्याचा काहीही फायदा होणार नाही.
केसाच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला दोन पार्टमध्ये काम करावे लागेल. यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी बाहेर फेकायच्या आहेत आणि कोणत्या आत घ्यायच्या आहेत हे, शिकले पाहिजे. जर तुम्ही या गोष्टी अगदी बरोबर शिकलात, तर मग तुम्ही केसच नाही तर इतर आजारांपासूनही दूर रहाल.
अशी काळजी घेतल्यास केसांना प्रदूषणाचा त्रास होणार नाही
आधी आपण कोणत्या गोष्टी बाहेरून करू शकतो, त्या पाहूया.
Take Out :
१) दररोज १६ तास उपवास ( १६ Hour Fasting )
आपल्या उपचार शक्तीला ( Healing Power ) शरीराला रिपेअर करण्यासाठी योग्य कालावधी लागतो. जर तुम्ही खातच राहिलात तर, हिलिंग पॉवरला शरीर रिपेअर करण्यास वेळच मिळत नाही. परिणामी शरीरात असलेली गंदगी शरीराला आजारी करत जाते. आणि पुढे आपल्याला गंभीर आजाराना सामोरे जावे लागते. या सगळ्या गोष्टींवर दररोज रात्री जेवल्यानंतर १६ तास उपवास करने तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. १६ घंटे उपवास आपल्या उपचार शक्तीला शरीर रिपेअर करण्यास पुरेसा कालावधी देते, त्यामुळे शरीरातील अनेक भयानक अजारासी लढण्यास शरीर सक्षम राहते.
२) एनीमा ( Enema )
एनीमा तुमच्या शरीरातील शेवटची गंदगी बाहेर टाकण्यासाठी प्रभावी उपचार आहे. एनीमाचा वापर करण्याचा लोकांना लाज वाटते. परंतु तुम्ही जर याचा वापर केलात तर शरीरातील साचलेली गंदगी काही मिनिटात निघून जाईल. तुम्ही साचवून ठेवलेली गंदगी बाहेर पडताच, तुम्हाला पोटाचा आजारा पासून आराम मिळेल. यामुळे शरीराचे काम सुरळीत चालेल.
३) ओली पट्टी ( Wet Pack )
हा उपाय देखील शरीराचे तापमान समतोल ठेवण्यासाठी उपयोगी ठरतो. यासाठी पोट, डोके यावरती थंड पाण्याची पट्टी ठेऊन काही वेळ असेच राहू द्या. यामुळे उर्ज्रचा प्रवाह वाढून रक्स्त प्रवाह वेगाने सुरळीत चालतो.
शरीरामधील आवश्यक गोष्टी
Take in:
४) सात्विक भोजन ( Satvic Food)
जेवढे भोजन सात्विक असते, तेवढे शरीरासाठी फायदेशीर असते. सात्विक भोजन शरीराला गुणसत्व देतेच, बरोबर पाचन शक्तीला ते पूरक असते. त्यामुळे शरीराला असे अन्न पचवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. जेवणात जेवढे होईल तितके मांस, दुध ई. पदार्थ कमी करा. असे पदार्थ पचण्यासाठी जड असतात. त्यामुळे शरीराला अधिक काम करावे लागते.
तुमच्या सात्विक भोजनात मोड आलेल्या कडधान्यांना प्रथम प्राधान्य द्या. यामध्ये नैसर्गिक जीवन देण्याची क्षमता असते. आणि ही शक्ती आपल्या शरीराला अतिशय फायदेशीर असते.
५) सूर्यप्रकाश (Sunlight)
मानवी शरीर सूर्यप्रकाशाशिवाय क्रियाशील राहूच शकत नाही. शरीराच्या प्रत्येक भागावर सुर्यप्रकाश पडलाच पाहिजे. यासाठी पहाटे पडणारा कोमल सूर्यप्रकाश शरीरासाठी खूप आवश्यक असतो. प्रखर सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहू नका.
मित्रानो या सगळ्या गोष्टी केस गळतीसाठीच नाही तर, इतर आजारांना देखील दूर ठेवतो. जसे मी वरती म्हटले होते कि केस गलती ही बाहेरील गोष्टीने होत नाही तर, शरीरातील होणाऱ्या बिघाडामुळे होत असते. आणि यासाठी आपले पोट मुख्य जबाबदार असते. जर तुम्ही वरील सर्व गोष्टी केल्यात तर, तुम्हाला केस गलती होणारच नाही.
सावधानी : बाजारातील घातक केमिकल्स ने बनवलेले शाम्पू, कंडीशनर वापरण्याची घाई करू नका. खरेदी करण्यापूर्वी एकदा बॉटलच्या पाठीमागे लिहिलेल्या सूचना वाचा. तुम्हाला समजून येईल कि आपल्याला काय करायचे आहे. मला वाटतं, अशी नावे तुम्ही कधी वाचली देखील नसतील. त्यातील केमिकल्स आपल्या डोक्याच्या अतिशय पातळ स्कीनमध्ये जाऊन, केसांची मुळे कमकुवत करतात, त्यामुळे आपले केस गळू लागतात. यासाठी आपल्याला घरामध्ये बनवलेल्या केमिकल्सरहित उपायांना अधिक प्राधान्य दिले पाहिजे. युटूबवरती अनेक घरात होणारे उपाय तुम्हाला मिळून जातील. योग्य उपचार परीक्षण करुन करुन पहा.
Read More :
चेहरा सुंदर आणि गोरा बनवणारे घरगुती उपाय