बुद्धिमान व्यक्तींची दिसणारी प्रमुख लक्षणे

SD &  Admin
0

बुद्धिमान व्यक्तींचा स्वभाव त्यांना इतर सामान्य लोकांपासून वेगळे करतात. त्यांचे हे गुण प्रत्येकाला आकर्षित करतात. या लोकांचे असेही गुण आहेत, ज्यावर तुम्ही कधी विश्वास ठेऊ शकणार नाही. मुख्य सर्वात महत्वाचा गुण म्हणजे बुद्धिमान लोकं हे खूप शांत, आपली मुद्देसुद्ध वक्तव्य मांडणारी आणि नम्र स्वभावाची असतात. या गुणांमुळे ही लोकांच्या  जवळ असतात. 

आपण बुद्धिमान लोकांचे काही प्रमुख लक्षणे पाहूया. जी तुम्ही आत्मसात केली तर, त्याचा तुम्हाला तुमच्या जीवनात खूप फायदा होईल.

बुद्धिमान व्यक्तींची दिसणारी प्रमुख लक्षणे

 स्मार्ट व बुद्धिमान लोकांची प्रमुख लक्षणे 


१) ते स्वतःशी बोलतात :

स्वतःशी बोलण्यात मंग्न असणाऱ्या व्यक्ती बुद्धिमान समजल्या जातात. अशा व्यक्ती अनेक प्रभावी विषयावर स्वतःशीच बोलत असतात. अशा वेळी त्यांना इतर गोष्टींचे भान देखील नसते. त्यामुळे त्या व्यक्ती त्यांनी विचार केलेल्या प्रत्येक गोष्टी बरोबर लक्षात ठेवतात. आणि योग्य वेळी त्यांचा वापर करतात.

२) त्यांना बौद्धिक आव्हाने आवडतात :

 
बुद्धिमान लोकं खूप विचार मंथन करणारी असतात. त्यांना नवीन नवीन गोष्टींवर अभ्यास करायला आवडते. आणि त्यासाठी ते खूप मेहनत घेतात. मेहनत घेताना जर त्यांना काही अडचणी आल्या तर, ते हसत हसत स्वीकारतात. मुख्य म्हणजे बुद्धिमान लोकं बदलाला कधीच घाबरत नाहीत.

३) ते अनेक गोष्टी विसरतात :   

बुद्धिमान लोकांना थोडा विसरण्याचा स्वभाव असतो. तुम्ही म्हणाल कि विसरणे तर बुद्धू लोकांचे काम असते. पण असे नाही. बुद्धिमान लोकं सतत विचार मंथनात असतात. जेव्हा ते एका गोष्टीवर फोकस करुन त्यावर विचार शक्तीचा मारा करत असतात, तेव्हा ते इतर गोष्टी विसरून जातात.

४) रात्री उशिरा झोपतात :

असे म्हटले जाते कि रात्री काम करण्याची क्षमता आपल्यात कमी असते. आणि ते प्रुफ देखील झाले आहे. अशा वेळी बुद्धिमान लोकं याच्या विरुद्ध पहाटे काम करण्यापेक्षा रात्री काम करण्यास पसंदी देतात. आणि आपल्या एक्स्ट्रा एनर्जीने बुद्धीचा वापर अधिक तेज करतात.


५) स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत असतात :

बुद्धीमान लोकं मिळाल्याला जीवनाचा पुरेपूर वापर करतात. त्यांना त्यांच जीवन वाया गेलेले आवडत नाही .म्हणून ते आपल्या स्वाभिमानासाठी आणि  स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत असतात. हा एक बुद्धिमान लोकांचा गुण आहे.

६) निसर्गाच्या बदलाला लगेच स्वीकारतात :

हा गुण या लोकांच्या मनामध्ये अत्यंत व्याप्त झालेला असतो. आणि म्हणूनच त्यांना इतर लोकांपासून वेगळे करतात. निसर्गाच्या बदलाला घाबरणारा मनुष्य कधीच प्रगती करु शकत नाही. आणि निसर्गाच्या बदलाला स्वीकारणारा मनुष्य बुद्धीमानच म्हटले पाहिजे.   

७) बुद्धिमान लोकं अति सोसलं होत नाहीत :

या लोकांचा हा विशेष स्वभाव आहे. यांना लोकांमध्ये राहायला आवडत नाहीत. जास्त करुन ही लोकं एकांत शोधत असतात. काही मोजकेच लोकं यांचे मित्र असतात. अन्यथा नात्या गोत्यात ही लोकं अडकून बसत नाहीत. याचा अर्थ असा नाही की यांना दुसरी लोकं आवडत नाही. परंतु या लोकांच लक्षच फार मोठं असल्यामुळे, यांना सोसलं राहणं अडचणीच वाटतं. 

८) इमोशनल असतात :

खूप इमोशनल असतात. मुळात ही शांत स्वभावाची असतात. लोकांना मदत करने, प्राणी मात्रांवर दया करने. हे त्यांच्या स्वभावातच असते. या लोकांना हिंसा, दंगा-मस्ती बिलकुल आवडत नाहीत. म्हणून तर कुणाच दु:ख बघून ते खूप इमोशनल होतात. 

९ ) सकाराम्क विचार :

बुद्धिमान लोकांच्या मनात फक्त आणि फक्त सकारात्मक विचार दौडत असतात. निगेटिव गोष्टीनां ते मनात थारा देत नाहीत. म्हणून ते लवकर यशस्वी होतात.

१०) रोमँटिक असतात :

अधिकांश लोकांच म्हणणं असत कि अशी लोकं रोमँटिक नसतात. पण असं नाही आहे, हि खूप रोमँटिक असतात.  आपल्या पार्टनर बरोबर ते खूप एन्जॉय करतात. पण ते विनाकारण दिखावा नाही करत. 

११) आपल्या वैयक्तिक समस्या इतरांपासून दूर ठेवतात :

ही लोकं आपल्या दु:खाचा पाडा इतरांसमोर कधीच वाचत बसत नाहीत. कारण त्यांना माहित असतं, आपल्या समस्यांचा, दु:खाचा पाडा लोकांबरोबर शेअर केल्याने लोकं जवळ येयाच सोडून दूर पळून जातात. तर मग विनाकारण आपला अपमान का करुन घ्या?

१२. अपमान सहन करत नाहीत 

या लोकांना कुणी अपमान केलेला कधीच आवडत नाही. म्हणून ते आधीच लोकांपासून दूर राहतात. आणि जर कुणी  विनाकारण त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला तर, ते न घाबरता त्या व्यक्तीशी दोन हात करण्यास मागे हटत नाहीत. म्हणून कुणीही त्यांच्या शांत बसण्याचा गैरफायदा घेऊ नये.

१३. वेळ वाया घालवत नाहीत

ही लोकं वेळेचा चांगला उपयोग करतात. त्यांना वेळ वाया गेलेला आवडत नाही. म्हणून त्यांचा प्लान आधीच तयार झालेला असतो. जेणे करुन वेळ वाया जायला नको.


बुद्धिमान लोकांची  ही काही प्रमुख लक्षणे आहेत. या पेक्षा देखील दुसरी लक्षणे असतील. ती प्रत्येक लोकांच्या विचारावर अवलंबून असतील.




Read More :

मानसिकदृष्ट्या मजबूत असेलेल्या लोकांच्या सवयी

जीवनातील काही गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवणे आवश्यक आहे

नोकरी गेल्यावर परिस्थितीला कसे सामोरे जाल ?

धावपळीच्या या आयुष्यात नैराश्याविषयी विचार करणे आवश्यक आहे

   

 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!