आज रस्त्यावरती मांडलेल्या गाड्यावरती खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अधिकांश लोकांचा नाश्ता, जेवण या उघद्या गाड्यावरच होतो. परंतु तुम्हाला माहित आहे का? आपण जे जेवण, नास्ता उघड्या जागेत करतो, त्यामुळे आपल्याला अनेक हेल्त प्रॉंब्लेम्सला सामोरे जावे लागते. कधी कधी खाण्याचा कालावधी अधिक वाढला तर, गंभीर आजारांना देखील सामोरे जावे लागते. माझा सांगण्याचा उद्देश गाड्यावरती खाऊ नये असा नाही, तर खाण्यापूर्वी पदार्थाची क्वालिटी चेक केली पाहिजे. त्याबरोबर जेवण करताना हाताळणाऱ्या वस्तूंची चौकशी केली पाहिजे. आजू- बाजूचा परिसर स्वच्छ आहे की नाही, हे पाहिले पाहिजे. यामुळे तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने हेल्दी राहाल.
मित्रानो भारतासारख्या मोठ्या लोकं संख्येच्या देशात प्रदूषणाचा विळखा अति वेगाने वाढत आहे. दिल्ली सारख्या राजधानीत श्वासनाचे आजार लोकांना झपाट्याने होत आहेत. दिल्लीच नाही तर, इतर शहरात देखील प्रदूषणाने प्रत्येकाला ग्रासले आहे. आणि अशा प्रदूषणाचे बारीक बारीक कण, आपण उगड्यावरती खात असताना जेवणात मिक्स होतात. या गंभीर विषयावरती प्रत्येकाला विचार करायला हवा.
जर तुम्हाला बाहेरचे पदार्थ खाण्याची मजबुरी असेल तर, तुम्ही जरासी काळजी घेतली तर, या विळख्यातून बाहेर पडू शकता. सगळेच गाडे खाण्यायोग्य नसतात, असे नाही. काही लोकं विशेच काळजी घेतात. अशा लोकांकडेच तुम्ही शक्यतो गेले तर बर होईल.
जाणून घेऊया आपण, उघड्यावरती पदार्थ खाण्याआधी कोणती काळजी घ्यायला हवी?
रस्त्याच्या बाजूला गाड्यावरती पदार्थ खाण्याआधी कोणती काळजी घ्यावी?
* पदार्थ करणारी व्यक्ती निरोगी, साफ सुतरी आहे की नाही, याकडे प्रथम लक्ष द्या ( विशेष नख कापलेली आहेत का नाही, हे पहा. हातावर, अंगावर जखमा आहेत का हे देखील पहा.
* पदार्थ बनवताना तंबाखू, किंवा सिगारेट ओढत आहे का, हे पहा.
* पिण्याच्या पाण्यात घाण आहे का नाही ते पहा.
* बर्फाचा वापर होत असेल तर, स्टोररूम एकदा पहावा.
* भांडी स्वच्छ आहेत का ते पहा.
* टेबल, खुर्ची, टेबलावर ठेवलेला जार. इकडे लक्ष जरूर असावे.
* हॉटेल भोवती उघडे गटार आहे का ते पहा. गटारातील घाणीवरच्या माश्या घोंगावत पदार्थावर येऊन बसतात. म्हणून काळजी घेतली पाहिजे.
* पदार्थ तळताना, तेल अनेक वेळा तापवले जाते. हे आरोग्यासाठी चुकीचे आहे. यावरती थोडा विचार करा.
* चहाचे देखील तसेच आहे. चहा वारंवार तापवला गेला तर, तो आरोग्यासाठी घातक असतो.
या काही स्वच्छतेच्या अनमोल गोष्टी आहेत. याकडे सगळ्यांचे लक्ष नक्कीच असायला पाहिजे. जर आज तुम्ही लक्ष दिले नाही तर, उद्याचा काळ तुम्हाला खूप त्रास देईल. म्हणून तुम्हीही काळजी घ्या आणि तुमच्या मुलांची देखील घ्या. समाज आपोपाप स्वच्छतेकडे वळेल.
Read More:
चांगली झोप येण्यासाठी हे उपाय करुन बघा
दही आरोग्य आणि सौंदर्यासाठी मदत करते