भारतासारख्या देशात चहाचे शौकीन प्रत्येक घरात दिसतील. काहीतर चहासाठी अगदी वेडे आहेत. दिवसातून ४ ते पाच वेळा त्यांचा चहा होतोच. परंतु आज सगळीकडेच चहा बद्दल वेगळे समज निर्माण झाले आहेत. त्यापेकी एक म्हणजे दुधाचा चहा पिणे योग्य आहे का नाही ? या प्रश्नाबद्दल अधिकांश लोकं संभ्रमात आहेत, काही म्हणतात दुधाचं चहा पिणे चांगला असतो. तर काही म्हणतात दुधाचा अति चहा पिणे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे असते. मला वाटते चहा पिणे काही वाईट नाही, परंतु त्याचा अतिरेक झाला तर त्याचे वाईट परिणाम देखील दिसून येतील.
आपण दुधाचा चहा पिणे योग्य आहे का ? हे पाहण्याआधी दुधाचा चहा पिण्याचे फायदे जाणून घेऊया.
दुधाचा चहा पिण्याचे फायदे :-
१. तणाव कमी करतो :
दुधाचा चहा थकवा कमी करतो. त्यामुळे मानसिक आराम मिळतो. बहुतांशी माणसे शरीरावरचा तान कमी करण्यासाठी दुधाचा चहा पितात.
२. प्रोटीनचा स्त्रोत :
दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी मदत मिळते. तसेच इतर ही अनेक फायदे दुधाच्या चहाचे सेवन केल्याने मिळते.
३. पचनास मदत :
चहा पचायला हलका असल्याने. त्यामुळे अनेक लोकांना पाचनापासून आराम मिळतो.
४. कॅफिनचा सौम्य हेल्दी प्रभाव :
चहामध्ये कॅफिन असते, त्यामुळे आपल्या शरीराला उत्तेजित करण्यासाठी मदत मिळते. त्यामुळे थकवा आला असेल तर लोकं चहाला आधी पसंदी देतात.
हे झाले दुधाचा चहा पिण्याचे फायदे. आता आपण याच्या उलट दुधाचा चहा पिण्याने तोटे काय होतात ते पाहूया. त्या नंतर तुम्ही ठरवा कि दुधाचा चहा पिणे योग्य आहे का नाही ?
दुधाचा चहा पिण्याचे तोटे:
१. अतिरिक्त साखर:
चहा बनवताना तुम्ही साखर टाकता. त्यामुळे तुमच्या शरीरात कॅलोरीचे प्रमाण वाढते. आणि जर असा चहा तुम्ही अति प्रमाणात सेवन करत असाल तर, वजन वाढणे, मधुमेह किंवा हृदयाच्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक असते.
२.पचनाची समस्या:
दुधाचा चहा घेतल्यावर अनेक लोकांना पचनासंबंधी समस्या निर्माण होतात. त्यामुळे गॅस, अपचन किंवा पोटात दुखणे अश्या समस्या सतत उद्भवतात.
३. कॅफिनचे अती सेवन:
दुधाचा चहा सतत घेत घेतल्यास, कॅफिनचे सेवन जास्त होऊ शकते. ज्यामुळे झोपेची समस्या, तणाव आणि अंगदुखी निर्माण होऊ शकते.
४. दूधातील पोषणतत्त्वांची कमी:
आजच्या शास्त्रीय संशोधनानुसार चहा आणि दूध एकत्र घेतल्यामुळे दूधातील काही पोषणतत्त्वांची शोषण क्षमता कमी होऊ शकते. मुख्यत: दुधात आढळणारे आयर्न (लोखंड) आणि इतर खनिजांची शोषण क्षमता घटते
वरील दोन्ही प्रश्नांची उत्तरे पाहिली तर, आपल्याला कळून येईल कि दुधाचा चहा अति प्रमाणात घेत असल्यास त्याचा वाईट परिणाम शरीरावर नक्कीच होऊ शकतो. परंतु जर योग्य प्रमाणात तुम्ही चहा घेत असाल तर, चहा तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. किंबहुना मी म्हणतो दुधाच्या चहापेक्षा कोरा चहा तुम्हाला आरोग्यदायी ठरू शकतो. परंतु तो ही योग्य प्रमाणात असावा.
टिप्स:
साखरेचे प्रमाण कमी करा:
चहामध्ये साखर घालण्याचे प्रमाण कमी करा किंवा त्या ऐवजी मध वापरला तर योग्य ठरू शकते.
अधिक कॅफिन टाळा:
कॅफिनचा जास्त वापर टाळा. अधिक कॅफिन तुम्हाला तणाव आणि इतर समस्या निर्माण करू शकते.
सारांश:
दररोज दुधाचा चहा पिणे काही वाईट नाही. परंतु चहा पिताना अधिक साखर किंवा कॅफिन घेतल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही संतुलित दुधाचा चहा घेत असल्यास तो आरोग्यदायी ठरू शकतो.
अधिक वाचा :
मनाला चांगलं फील करण्याचे पाच मिनिटाचे मेडीटेशन तंत्र
स्टोन थेरपी काय आहे ? तिचा वापर करून आजारांपासून सुटका कशी करू शकतो ?
दही आरोग्य आणि सौंदर्यासाठी मदत करते
चांगली झोप येण्यासाठी हे उपाय करुन बघा