खाण्यावर कंट्रोल नसणे, बाजारातील नको त्या गोष्टी खाणे. जेवणात अति साखरेचे प्रमाण. या मुळे शरीरात साखर वाढून शरीर रोगी होऊन जाते. हळू, हळू शरीरात गंभीर बदल होत जातात. या आजारामध्ये डायबेटीज मुख्य रोग आहे, जो धरतीवरच्या अधिकांश लोकांना ग्रासत आहे.
मधुमेहाची ( डायबेटीज) चिन्हे आणि लक्षणे : सरासरीने स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना हृदय विकार हा अधिक दिसून येतो. आणि तो पुढे गंभीर स्वरूपाचे रूप दाखवतो. भारतासारख्या देशात याचे प्रमाण अधिक आहे. जेव्हा साखरेचे प्रमाण वाढते, तेव्हा हृदय विकारच नाही तर, हा डायबेटीज हृदयविकारा
बरोबर डोळे, किडनी, त्वचा आणि शरीराच्या इतर अवयवांवरही परिणाम करतो.
याशिवाय डायबेटीजमुळे पुरुषांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते, ज्यामध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन (ED) आणि इतर अनेक मूत्र समस्या समाविष्ट आहेत. या आजारांचा परिणाम पुरुषांच्या शरीरावर कसा दिसून येतो ते पाहूया.
पुरुषांमध्ये मधुमेहाची लक्षणे कोणती?
मूत्र लक्षणे
डायबेटीजमुळे पुरुषांना लघवीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. ज्यामध्ये वारंवार लघवी होणे, लघवी करताना अडचण, लघवी संसर्ग या सारख्या पीडादायक आजारांचा समावेश होतो. अशा परिस्थितीत तुम्हाला ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
शरीरातील टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी होणे
डायबिटीजच्या प्रभावामुळे पुरुषांच्या शरीरात टेस्टोरोन हार्मोनचा स्तर कमी होण्याची संभावना अधिक असते. याच्या परिणाम म्हणून संभोगात अडचण येणे, नैराश्य, थकवा येणे आदी समस्या उद्भवू शकतात. म्हणून जर तुम्हाला अशी चिन्हे दिसल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या
रक्तदाब वाढतो
डायबेटीज ग्रस्त पुरुषांना उच्च रक्तदाबाच्या समस्या उद्भवू शकतात. दुर्लक्ष करणे तुम्हाला पुढे गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. यासाठी त्वरित सावधानी बाळगली तर परिस्थिती गंभीर होण्यापासून रोखता येईल
इरेक्टाइल डिसफंक्शन
डायबेटीजमुळे पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शनचा त्रास होऊ शकतो. या डिसफंक्शनचा त्रास तुम्हाला अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतो. ज्यामुळे रक्तातील साखरे बरोबर उच्च रक्तदाब, किडनी रोग, मज्जासंस्थेची स्थिती, लठ्ठपणा ई. आजार तुमच्या पुढे उभे राहतील.
स्खलन होणे
डायबेटीजने ग्रस्त पुरुषांना वीर्यपतन सारख्या समस्या होऊ शकतात. या प्रक्रीयेमध्ये काही शुक्राणू मूत्राशयात मिक्स होतात किंबुहुना सोडले जातात. या मुळे शुक्राणू कमी होऊ शकतात. जर तुम्हाला अशा समस्या येत असतील तर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वरील सर्व लक्षणे ही साखरेच्या अति सेवनामुळे दिसून येतात. त्यामुळे आहारात साखरेचे प्रमाण मर्यादित असावे. शक्यतो सफेद साखरेला आहारातून पूर्णतः बाजूला करने कधीही चांगले. त्याऐवजी ब्राऊन सुगर, गुळ याचा वापर तुम्हाला फायदेशीर ठरेल. परंतु पदार्थ कितीही चांगला असला तरी, त्यांचा वापर हा मर्यादितच असला पाहिजे. आणि मुख्यता आपल्या शरीराला आवश्यक गोष्टीच घेतल्या पाहिजेत. हे कधीही चांगले.
Read More: