सुख संपन्न हेल्दी जीवन जगण्यासाठी आपल्या दिवसाचा दिनक्रम हा सुनियोजित हेल्दी असावा. जेणेकरुन तुमचे शरीर तुम्हाला मोठे सुखी आयुष्य प्रदान करेल.
तुम्ही तुमच्या रुटीनची डायरी लिहिली तर खुचच छान होईल. त्यामुळे तुम्हाला दररोज काय करायचे आहे, हे पटकन समजून येईल. आणि विसरण्याचा प्रश्नच राहणार नाही. हा एक उत्तम उपाय आहे.
आपण प्रत्येक दिवसाचा हेल्दी दिनक्रम कसा असावा याबाबत सविस्तर जाणून घेऊया. यात काही गोष्टी अनेकांना वेळेवर करायला अशक्य असतील. कारण त्यांच्या कामाच्या वेळा या वेगवेगळ्या असू शकतील. परंतु जेवढे होईल तितके नियम फॉलो करायला काही हरकत नाही. खूप बेसिक गोष्टी आहेत. एकदा का आवड निर्माण होऊ लागली कि तुम्हाला त्याची रोजची सवय होऊन जाईल.
दिवसाचा हेल्दी दिनक्रम असा ठेवा : हेल्दी डेली रुटीन
सकाळची अशी सुरुवात असेल:
सकाळी ५:३० ते ६:३० च्या दरम्यान उठले पाहिजे.
उठल्यावर १ ग्लास कोमट पाणी प्या. त्यात लिंबाचा रस किंवा मध घालू शकता.सकाळची सुरवात प्राणायाम किंवा
ध्यान करुन केली तर दिवसच नाही तर पुढील आयुष्य तुमचे सुखाचे होईल. यासाठी किमान १५-२० मिनिटे
प्राणायाम किंवा ध्यान करा.शरीराला स्ट्रेच करण्यासाठी २०-३० मिनिटे योग किंवा हलका व्यायाम करा.
सकाळचा नाश्ता
सकाळचा नाश्ता संतुलित घ्या. उदा., पोहे, उपमा, पराठा, अंडी, फळे, दूध किंवा ओट्स.
जास्त तळलेले किंवा तेलकट पदार्थ टाळा.
दिवसाची सुरूवात:
दिवसाची सुरवात करण्याआधी कामाचा नियोजन असले पाहिजे. जेणेकरून कामाचे वेळापत्रक चुकणार नाही.
दिवसासाठीचे प्राधान्यक्रम ठरवा आणि वेळेचे व्यवस्थापन करा.
एखाद्या महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा.
मधला ब्रेक (१०-११ वाजता)
हलका स्नॅक घ्या (उदा., नट्स, फळे, अंकुरित कडधान्य).
दुपारचे जेवण १- १:३० वाजता करा.
संतुलित आहार घ्या. यात डाळ, भाजी, चपाती, तांदूळ, सूप आणि सॅलड यांचा समावेश असावा.
दिवसात पाणी पुरेसे प्या. जेवण करताना पाणी पिणे टाळा. आवश्यक असल्यास थोडे पाणी प्या. पाणी पिण्याची
वेळ ही असी असली पाहिजे. जेवणाआधी १५-२० मिनिटे आधी पाणी प्या. व जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्या.
थोडा आराम करा १०-१५ मिनिटे
जेवणानंतर ५-१० मिनिटे चालण्याचा प्रयत्न करा. जास्त वेळ झोपू नका.
दुपारी आणि संध्याकाळची वेळ:
हलका स्नॅक घेऊ शकता ४-५ वाजता.
ग्रीन टी, हर्बल टी किंवा लो फॅट स्नॅक घ्या.
बिस्किटे किंवा प्रोसेस्ड पदार्थ टाळा.
संध्याकाळचा व्यायाम
३०-४५ मिनिटे जॉगिंग, चालणे, सायकलिंग किंवा जिम करा.
शक्य असल्यास मैदानी खेळांमध्ये सहभागी व्हा.
रात्रीची वेळ:
रात्रीचे जेवण ७ ते 8 वाजे पर्यंत करा. हलके आणि पचनास सोपे जेवण घ्या. उदा., सूप, भाजी-पोळी, खिचडी किंवा डाळ-भात.
झोपेच्या २ ते ३ तास आधी जेवण पूर्ण करा.
झोपण्यापूर्वीची दिनचर्या
मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा वापर कमी करा.
पुस्तके वाचली पाहिजेत, बरोबर ध्यान करून मन शांत करण्याचा प्रयत्न करा.
झोपण्याआधी एक ग्लास कोमट दूध पिऊ शकता.
महत्त्वाचे टिप्स:
दिवसभर पुरेसे पाणी प्या (अडीच ते तीन लिटर).
सातत्याने बसून काम करत असल्यास दर तासाला ५ मिनिटे चालणे किंवा स्ट्रेचिंग करा.
आठवड्यातून एक दिवस संपूर्ण आरामासाठी ठेवा.
मित्रानों तुमचा दिनक्रम असा असला पाहिजे. खूप काही कठीण नाही आहे. तुमच्या जीवनशैलीत लागू करण्याचा प्रयत्न करा. हळू हळू तुमच्या जीवनात तुम्हाला सकारात्मक बदल जाणवतील!
तुम्हाला जर पुस्तके वाचनाची आवड असेल, तर आपला दिनक्रम कसा असावा, हे उत्तमपण सांगणारी काही पुस्तके रेफर करत आहे. ऑनलाईन चेक करुन ऑर्डर करू शकता.
विनंती करतो कि पुस्तके वाचनाची आवड असेल आणि त्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल तरच पुस्तके विकत घ्या.
हे ब्लॉग्स देखील वाचा
मनाला चांगलं फील करण्याचे पाच मिनिटाचे मेडीटेशन तंत्र
स्टोन थेरपी काय आहे ? तिचा वापर करून आजारांपासून सुटका कशी करू शकतो ?
शरीरात पाणी टिकून राहिल्याने कोणत्या समस्या उद्भवतात : Water Retention Bad for Body
त्वचेला होणारी खाज कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा