जर तुम्हाला वाटत असेल कि तुम्ही धुम्रपान करत नाही, तर धूम्रपानाच्या परिणामांपासून दूर आहात. जर तुम्ही असा विचार करत असाल तर. तुम्ही चुकीचे विचार करत आहात.
जगात दरवर्षी सुमारे १३ लाख लोकांचा मृत्यू अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे होत असतो. विशेष करुन लहान मुलांना याचा खूप त्रास होत आहे.
तुम्हाला कदाचित माहित असावे, तंबाखूच्या धुरात सुमारे तीन डझन पेक्षा जास्त कॅन्सर निर्माण करणरे वाहक आणि चार हजारां पेक्षा जास्त घातक रसायने असतात. याच्या परिणाम स्वरूप सिगारेटच्या धुरात असलेले कार्बन मोनो ऑक्साईड व इतर विषारी वायू, रक्तातील ऑक्सिजनची पातळीवर परिणाम करू शकतात. तसेच धुरातून निघणारे अति हानिकारक घटक श्वासावाटे इतरांमध्ये प्रवेश करुन दीर्घकाळ राहू शकतात.
मित्रानों या घातक परिणामांचे आपल्या आयुष्यात गंभीर स्वरूपाचे आजार होण्याची शक्यता अधिक असते. आपण जाणून घेऊया कि धुम्रपानामुळे कोणाला आणि कशाप्रकारे आजार होऊ शकतात.
धुम्रपानामुळे होणारे घातक परिणाम
मुलांसाठी घातक
धुम्रपानामुळे सर्वात जास्त लहान मुले सहन करतात. वारंवार सर्दी, खोकला, न्यूमोनिया, फुप्फुसांच्या समस्या, श्वसनाच्या समस्या होण्याची शक्यता अधिक असते.
प्रौढांना धोका
जर वयस्कर लोकं सतत सिगारेट घेणाऱ्या लोकांच्या संपर्कात असतील तर, त्या व्यक्तीचे रक्त घट्ट बनून चिकट व गुठळीयुक्त बनवू शकते. यामुळे अशा लोकांना हृदयविकाराचा झटका व स्ट्रोकची शक्यता अधिक वाढते. तसेच श्वसनाच्या समस्या होण्याची शक्यता अधिक असते.
गर्भवती महिलांना होणारे परिणाम
धुम्रपानामुळे गर्भवती महिलांमध्ये गर्भापर्यंत ऑक्सिजन आणि पोषक पदार्थ पोहोचवणाऱ्या नळ्या आकसून छोट्या होतात. यामुळे शिशुला पुरेसे पोषण मिळत नाही. आणि त्या बाळाच्या विकासावर विपरीत परिणाम होतो. तसेच श्वसनाच्या समस्या व डोळ्याच्या समस्या देखील होण्याची शक्यता अधिक असते.
या व्यतिरिक्त देखील अनेक प्रकारचे गंभीर आजार लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच वर्गातील लोकांना होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी स्वतःहून धूम्रपानापासून दूर रहा आणि धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीपासून कोसो दूर रहा.
तुम्ही या गंभीर आजारापासून दूर राहण्यासाठी काय करू शकता?
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान प्रतिबंधित क्षेत्रातच राहावे.
धूम्रपान करणाऱ्यांपासून शक्यतो दूर राहावे.
घरात किंवा ऑफिसमध्ये धूम्रपान पूर्णपणे बंद करावे.
या काही मोजक्या परंतु परिणामकारक टिप्स आहेत, त्या नक्कीच फॉलो करा. शक्यतो मोठ्यांनी लहान मुलांची आणि वयस्कर लोकांची काळजी घ्यायची आहे. यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात.
तसेच पुढे वाचा
शरीरावर परिणाम करणारा अपचनाचा त्रास व उपाय
चांगली झोप येण्यासाठी हे उपाय करुन बघा
पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल ?