दातांच्या आरोग्यासाठी आरोग्यदायी टिप्स

SD &  Admin
0

दात आपल्या शरीरातील मुख्य अवयव आहे. याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. कारण एकदा का दाताचे आरोग्य बिघडले तर, मात्र जीव नकोसा होतो. म्हणून या वेदनेपासून सुटका हवी असेल तर, दातांकडे विशेष लक्ष देणे अतिआवश्यक आहे.

यासाठी आम्ही दातांच्या आरोग्यासाठी आरोग्यदायी टिप्स  देत आहोत. त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा.

दातांच्या आरोग्यासाठी आरोग्यदायी टिप्स

दातांच्या आरोग्यासाठी खालील आरोग्यदायी टिप्स उपयुक्त ठरतील

१.
सकाळी आणि रात्री न चुकता ब्रश करा. यामुळे दात निरोगी राहतील.

. दात धुवताना अति जोर लावू नका. यामुळे दातांची झीज लवकर होते. यामुळे जेव्हा तुम्ही तिखट किंवा गार पदार्थ खाता तेव्हा तीव्र वेदना होतात.

३.
दर सहा महिन्यांनी दातांची तपासणी करने आवश्यक आहे.

४.
शीतपेय पिण्या ऐवजी पाणी प्या हे दातांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

५.
जेव्हा तुम्ही काही खाता तेव्हा चांगली चूळ भरा. यामुळे दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण बाहेर निघतात. त्यामुळे तोंडाला वासही येत नाही आणि दातांचे आरोग्य देखील निरोगी राहते.

६. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ड युक्त पदार्थ खा: दूध, चीज, दही, आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करा.

७. ताजी फळे आणि भाज्या खा: गाजर, सफरचंद यासारख्या ताज्या पदार्थांचा आहारात समावेश करा.


या गोष्टी टाळा

१.
जास्त गोड पदार्थ, चॉकलेट आणि फास्ट फूड ई. खाणे टाळा.

२.
जास्त शीतपेय पिणे टाळा. यामुळे दातांचे आरोग्य बिघडते.

३.
बाजारातील पॅकबंद फ्रुट ज्यूस, ई. गोष्टी अधिक खाऊ नये. त्यामध्ये साखर आणि एसिड असते. त्यामुळे यापासून दूर राहणे कधीही चांगले.

४. तंबाखू आणि धूम्रपान टाळा. तंबाखू आणि सिगारेटमुळे दात पिवळसर होऊ शकतात आणि गंभीर दातांच्या आजारांना निमंत्रण मिळते.



वरील सर्व टिप्स दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तरीही दातांचे आरोग्य अधिक बिघडत आहे, असे तुम्हाला वाटलं असेल, तर डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या.


 

तसेच अधिक वाचा

रक्ताची पातळी वाढवणारे उपाय

पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल ?

थकव्याला दूर ठेवण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावेत ?

शरीरावर परिणाम करणारा अपचनाचा त्रास व उपाय



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!