पायांना भेगा पडणे, टाचा दुखणे यामुळे अनेकजन पिडीत असतात. याचे मुख्य कारण आहे, पायांच्या स्वच्छतेकडे केलेले दुर्लक्ष. परंतु तुम्ही वेळीच उपयोजना केलात तर, तुम्हाला या वेदनेतून मुक्तता मिळेल. आपण यावरती उपाय जाणून घेऊया.
पायांच्या टाचांना अशा प्रकारे सुरक्षा कवच द्या
💣 टाचांना कैरी चोळण्याने चांगला आराम आणि सुधारणा होते.
💣 कच्च्या पपईचा कीस. त्यामध्ये थोडं सरसोचे तेल आणि त्यामध्ये हळद मिसळा. तयार केलेली पेस्ट टाचांना लावा आणि त्यावरती पट्टी बांधा.
💣 टाचा आणि तळव्यांना मेंदी लावल्याने देखील फायदा मिळतो.
💣 रात्री झोपण्यापूर्वी पायांवर ग्लिसरीन आणि गुलाब चोळा किंवा जैतूनच्या तेलाने मालिश करा.
💣 टाचांना भेगा पडल्या असल्यास पाय गरम पाण्याने धुऊन प्युमिक स्टोनने चोळा. त्यानंतर सरसोच्या तेलामध्ये सैंधव मीठ मिसळून लावा. नंतर शेक द्या. शेवटी टाचांवर कापूस बांधून ठेवा.
💣 टाचा फुटल्या असल्यास सरसोच्या तेलामध्ये मेण मिसळून लावल्याने देखील फायदा मिळतो.
💣 आठवड्यातून एकदा कोमट पाण्यात लिंबू पिळून, त्यामध्ये पाय थोडावेळ भिजवून ठेवा. यामुळे पाय स्वच्छ होतील.
💣 व्हिनेगरमध्ये टारपीनचे तेल आणि अंडे फोडून टाचांवर लावल्याने चांगला फायदा मिळतो.
💣 टाचांना दररोज तुपाने मालिश केल्यास, टाचांवरील भेगा लवकर भरण्यास मदत होते.
💣 पाण्यामध्ये बोरिक पावडर मिसळून, ते मिश्रण कोमट करा. त्यांनतर त्यात पाय बुडवून ठेवा. भेगा लवकर भरण्यास मदत होते.
💣 पाण्यामध्ये बीटाचे तुकडे उकळून घ्या. त्यानंतर पाणी कोमट झाल्यानंतर, त्या पाण्याने पाय धुऊन घ्या. तुम्ही बीटाचे तुकडे देखील पायाला चोळू शकता.
वरील सर्व उपाय हे आयुर्वेदिक पद्धतीने सांगितलेले आहेत. तरीही उपाय करण्याआधी चांगल्या डॉक्टरकाढून अथवा वैद्याकडून औषधांची पडताळणी करुन घ्या.
यह पोस्ट भी पढ़ें
उघड्यावरील पदार्थ खाण्याआधी कोणती काळजी घ्यावी?
दिवाळीत शरीर आणि मन दोघांची कशी काळजी घ्याल?
दिवसभरात भरपूर पाणी पिणे का आवश्यक आहे ?
शाकाहारी लोकांसाठी जवसाच्या बिया आहेत, हेल्दी फूड