लहान मुलं ही कोमल फुलांसारखी असतात. तसेच ती जिज्ञासू देखील असतात. सतत त्यांची काहीतरी नवीन जाणून घेण्याची धडपड असते. यासाठी ते समोर दिसणारी प्रत्येक वस्तू हाताळण्याचा प्रयत्न करत असतात. यावेळी त्यांच्या मनात जरासा देखील हा भाव नसतो कि ते ज्या वस्तूला हाताळत आहेत, त्या वस्तूंपासून त्यांना इजा होण्याची शक्यता असते. अशा वेळी पालकांना याबाबत अधिक सावध राहणे फार गरजेचे असते. याऊलट जर तुम्ही निष्काळजीपणा दाखवला तर तुमच्या मुलांना गंभीर इजा होण्याची शक्यता असते.
घरामध्ये मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही काही महत्वाच्या टिप्स देत आहोत, त्या तुम्ही न चुकता नक्कीच फॉलो करा.
घरात होणाऱ्या दुर्घटनांपासून मुलांना वाचवणाऱ्या गोष्टी
१. टेबल, इतर टोकदार फर्निचर तुमच्या घरात असेल तर, तुम्ही त्यांच्या कोपऱ्यास कुशन लावा. जेणेकरून मुलांना टोकदार कोपऱ्यापासून कोणतीही इजा होणार नाही.
२. घरातील सर्व विजेच्या प्लगवर सेफ्टी कवर अवश्य लावा. त्याहून विजेचा प्लगचा स्विच बंदच ठेवा. जेव्हा आवश्यकता असेल, तेव्हाच त्याचा वापर करा.
३. घरात वापरात येणाऱ्या ज्वलनशील वस्तू मुलांसाठी अतिशय धोकादायक असतात. जसे माचीस, लाईटर, इलेक्ट्रिक वस्तू ई. त्यांच्या हाताला येणार नाही अशा ठिकाणी ठेवा.
४. नको असलेल्या गोष्टी घरात ठेवण्यापेक्षा त्या कचराकुंडीत टाका. विनाकारण त्या मुलांच्या हाताला लागल्या तर, इजा वैगरे करुन घेऊ शकतात. यासाठी आधीच त्या वस्तूंची व्हिल्लेवाट लाऊन टाका.
५. पाळीव प्राण्यांचा आहार आणि मुलांचा आहार वेगवेगळा ठेवा. मुलांना अशा गोष्टींबद्दल मुळीच जाणीव नसते.
६. स्मोक डिटेक्टरला योग्य ठिकाणी ठेवा.
७. गरम भांडी असतील, तेव्हा ती मुलांपासून दूर ठेवा. तसेच कुकर, इलेक्ट्रिक किटली ई. भांडी मुलांच्या हाताला लागणार नाही याची काळजी घ्या.
८. मुलांना कधीच उंच खुर्ची किंवा बेडवरती ठेऊन जाऊ नका. तुमच्या गैरहजेरीमध्ये त्यांना खाली उतरताना इजा होऊ शकते.
९. सर्वात महत्वाचं तारखेच्या बाहेर गेलेले खायचे पदार्थ, तसेच तारखेच्या बाहेर गेलेले मेडिसिन त्यांच्यापासून न विसरता दूर ठेवा.
या काही महत्वाच्या काळजीवाहू गोष्टी आहेत, त्यांना न विसरता यावरती लक्ष ठेवणे अति गरजेचे आहे. हे तुमच्या मुलांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे.
मुलांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या काही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता
बाळासाठी कॉर्नर प्रोटेक्टर : Corner Protector for Baby
बेबी प्रूफिंग एज आणि कॉर्नर गार्ड्स : Baby Proofing Edge & Corner Guards
बेबीप्रूफिंग इलेक्ट्रिक सॉकेट कव्हर्स : BabyProofing Electric Socket Covers
मुलांचे सुरक्षा दार पिंच गार्ड : Children Safety Door Pinch Guard
हे देखील वाचा
सुखी विवाहित जीवनासाठी लव मेरेज की अरेंज मेरेज बेस्ट आहे.
डेटिंग अॅप्सच्या प्रेमात भारतीय तरुणाई
एकाच्या प्रेमात असताना दुसऱ्यासाठी मन धडधडतय? जाणून घ्या त्यावेळी काय करावे
नाते घट्ट करण्यासाठी कोणत्या चुका टाळायला हव्यात?
तुमची पत्नी या स्वभावाची आहे का?