MAHAKUMBH MELA 2025: महाकुंभ मेला जगातला सर्वात मोठा धामिर्क आणि भक्तिमय मेला आहे. हा मेला यावर्षी म्हणजे २०२५ मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारी २०२५ पासून २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर होणारा हा मेला हिंदू धर्मातील लोकांनाच नाही तर अन्य धर्मातील लोकांना देखील अध्यात्मिक ज्ञानाची शिकावन देतो.
हिंदू धर्मात महाकुंभला विशेष आणि धार्मिक स्थान आहे. हा मेला फक्त धार्मिकच नसून बरोबर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या मेळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक प्रयागराज येथे एकत्र येतात आणि विविध धार्मिक विधी, स्नान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. या कुंभ मेळ्यात फक्त सामान्य भाविकच नाही तर अनेक साधू संतांची हजेरी असते.
सध्याच्या २०२५ महाकुंभ मेळ्याच्या पहिल्या दिवशी सुमारे 60 लाख भाविकांनी पवित्र स्नान केले. यावरून तुम्हाला अंदाजा आला असेल की या मेल्याला जगातील सर्वात मेला का म्हटले आहे.
महाकुंभ मेळ्याची खास महत्वपूर्ण वैशिष्ट्ये
दिव्य स्नानाचे दिवस. महाकुंभ मेळ्यातील दिव्य स्नानाचे दिवस विशेष महत्त्वाचे असतात. या दिवशी विविध प्रकारचे साधू आणि संत मोठ्या उत्साहाने स्नान करतात. भाविक ही मोठ्या प्रमाणात या आनंद सोहळ्यात सहभागी होत असतात.
या वर्षीच्या दिव्या स्नानाच्या वेळा अशा असतील.
दिव्य स्नान:
क्र. सणाचे नाव तारीख
१ पौष पूर्णिमा १३-०१-२०२५
२ मकर संक्रांत १४-०१-२०२५
३ मौनी अमावस्या (सोमवती) २९-०१-२०२५
४ वसंत पंचमी ०३-०२-२०२५
५ माघी पूर्णिमा १२ -०२-२०२५
आर्थिक प्रभाव:
१२ वर्षानंतर येणाऱ्या या २०२५ च्या महाकुंभ मेळ्यासाठी सुमारे रु.६३८२ कोटींचा बजेट आहे आणि उत्तर प्रदेशासाठी या मेळ्यातून रु.२ लाख कोटींपेक्षा जास्त उत्पन्न होण्याचा अंदाज आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने अनेकांना रोजगार मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय सहभाग:
या महाकुंभ मेळ्यात देश-विदेशातील लाखो भाविक सहभागी होतात. परंतु या महाकुंभ मेळ्यात अंदाजे ४०० दशलक्ष म्हणजेच ४० कोटी लोकांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे, ज्यामध्ये अमेरिका, इस्रायल, फ्रान्स आणि इतर देशांतील मान्यवरांचाही समावेश असेल.
पेशवाई मिवणूक:
मेळ्यात विविध प्रकारचे साधू आणि संत पारंपारिक पद्धतीने हत्ती, घोडे आणि रथांवरून शोभायात्रा काढतात, ज्याला 'पेशवाई' म्हणतात.
महाकुंभ किती वर्षांनी येतो?
महाकुंभमेळा दर १२ वर्षांनी एकदा भरतो. हा मेळा गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती (प्रयागराज) नद्यांच्या संगमावर किंवा इतर पवित्र ठिकाणी भरतो.
महाकुंभाचे आयोजन ज्योतिषशास्त्रीय गणनेवर आधारित आहे आणि जेव्हा गुरु आणि सूर्य हे ग्रह विशिष्ट राशीत असतात तेव्हा ते घडते.
कुंभमेळा चार ठिकाणी आयोजित केला जातो:
प्रयागराज (उत्तर प्रदेश)
हरिद्वार (उत्तराखंड)
उज्जैन (मध्य प्रदेश)
नाशिक (महाराष्ट्र)
याशिवाय, दर ६ वर्षांनी अर्धकुंभ मेळा आयोजित केला जातो.
महाकुंभात किती दिव्य स्नानगृहे आहेत?
महाकुंभमेळ्यात ६ प्रमुख दिव्य स्नानगृहे आहेत. हे दिव्य स्नान हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. आणि ते शुभ काळ आणि ज्योतिषीय गणनेवर आधारित असतात. प्रत्येक दिव्य स्नानाच्या दिवशी, संत, ऋषी, आखाडे आणि लाखो भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात.
२०२५ च्या महाकुंभाच्या दिव्य स्नानाच्या तारखा:
पौष पौर्णिमा – १३ जानेवारी २०२५
मकर संक्रांती – १४ जानेवारी २०२५
मौनी अमावस्या (सोमवती अमावस्या) – २९ जानेवारी २०२५ (सर्वात मोठे दिव्य स्नान)
वसंत पंचमी – ३ फेब्रुवारी २०२५
माघी पौर्णिमा – १२ फेब्रुवारी २०२५
महाशिवरात्री – २६ फेब्रुवारी २०२५
दिव्य स्नानाचे महत्त्व:
दिव्य स्नानादरम्यान, संत आणि विविध आखाडे पारंपारिकपणे संगमावर मोठ्या आनंदाने स्नान करतात.
या स्नानांना आध्यात्मिकदृष्ट्या पापांपासून मुक्ती, आत्म्याचे शुद्धीकरण आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग मानले जाते.
या दिवसांचे मुख्य आकर्षण म्हणजे पेशवाईची मिरवणूक आणि आखाड्यांचे स्नान.
या स्नानात सहभागी होण्यासाठी जगभरातून लाखो भाविक येतात.
पूर्वीचे शाही स्नान बदलून दिव्य स्नान करण्याची कारणे
शाही स्नानाचे नाव बदलून ‘दिव्य स्नान’ असे करण्यात आले आहे. हा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ मेळा २०२५ च्या पार्श्वभूमीवर घेतला आहे.
नाव बदलण्याचे कारण:
संवेदनशीलता:
शाही स्नान या नावामुळे काही ठिकाणी असमानतेचा आभास निर्माण होतो, त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये धार्मिक सोहळ्याच्या भावना अधिक दृढ करण्यासाठी नाव बदलण्यात आले. तसेच दिव्य स्नान' हे नाव अधिक सर्वसमावेशक आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. नाव जरी बदलले असले तरी यामागील धार्मिक महत्त्व तसेच विधी परंपरेप्रमाणेच पार पडणार आहेत.
महत्त्व:
या काळात संगमावर स्नान केल्याने पापक्षय होतो आणि मोक्षप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. साधू-संत, आखाड्यांच्या शोभायात्रा, विविध धार्मिक विधी, भजन, कीर्तन आणि सत्संग यामध्ये भाविक सहभागी होतात.
सुविधा:
उत्तर प्रदेश सरकारने भाविकांसाठी आधुनिक सुविधा उभारल्या आहेत, जसे की तात्पुरती घरे, स्वच्छतागृहे, स्वच्छ पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्था आणि वैद्यकीय सेवा. तसेच महाकुंभ २०२५ मध्ये ऑनलाइन नोंदणी, जीपीएस ट्रॅकिंग आणि संगमावर लाइव्ह दर्शनाची सुविधा असेल.
पर्यावरणपूरक उपक्रम:
प्लास्टिकमुक्त परिसर, स्वच्छता मोहिम आणि गंगा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जातील.
महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी :
मेळ्यात सहभागी होण्यापूर्वी नोंदणी करा.
गर्दीमुळे सुरक्षिततेसाठी सर्व सूचना पाळा.
महाकुंभ हा नुसता मेला नसून अध्यात्मिक ज्ञानाचे महापीठ आहे. यावेळी प्ररत्येक माणसाच्या मनात अतूट श्रद्धा निर्माण होते. ईश्वराच्या सहवाचे हे प्रतिक आहे. यामुळे लोकांच्या मनात सांस्कृतिक एकतेची भावना निर्माण होते. हे ज्ञानपीठ अनेक लाखो लोकांना एकत्र आणण्याचे काम करते.