असं म्हटलं जातं "नारळाच्या पाण्याशिवाय दुसरं असं काय शुद्ध आहे" खरच नारळाचे पाणी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. कडक उन्हात तर नारळाचे पाणी जवळ भेटले तर, देवच भेटला असे वाटते. हे पाणी नुसतं मनाला आणि शरीराला थंड आणि शांतच ठेवत नाही तर, त्याचे इतर ही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
नारळ पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे
१. उन्हळ्यात आपल्या शरीराला अधिक पाण्याची गरज असते. परंतु कधी कधी पाण्याची कमतरता पडल्यामुळे शरीर आजारी पडू लागते. तसेच इतर आजारांना देखील सामोरे जावे लागते. अशा वेळी नियमितपणे नारळाचे पाणी पिल्याने शरीरात पाण्याची कमतरता कमी होते. शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवली जातात.२. उच्चदाब संतुलित करण्यासाठी नारळपाणी विशेष उपयोगी पडते. नारळाच्या पाण्यात असलेले जीवनसत्व-क, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका निभावतात.
३. जर तुम्हाला असे वाटत असेल कि चेहऱ्यावर आता वय दिसू लागले आहे, तर अशा वेळी त्वरित नारळाच्या पाण्याचे सेवन करण्यास सुरवात करा. तुम्हाला हळू हळू जाणवेल, तुमच्यामध्ये विशेष पॉवर निर्मित होत आहे. ती तुमच्या वयाला दूर ठेवेल.
४. जर तुम्ही वाढलेले वजन आणि लठ्ठपणाने त्रासून गेलेले आहात तर आठवड्यात तीन-चार वेळा नारळ पाणी नक्कीच प्या.
५. कदाचित तुम्हाला माहित असावे, नारळपाणी सर्वात्तम हार्ट टॉनिक आहे. ते कालेस्टेरॉल आणि मेदयुक्त असते. त्यामुळे हार्टसंबधी आजारांपासून ते तुम्हाला दूर ठेवते.
६. जर तुम्हाला दररोज डोके दुखीचा त्रास असेल तर, न चुकता नारळ पाणी प्या.
७. नारळाचे पाणी गर्भावस्थेत होणाऱ्या समस्यांपासून दूर ठेवते. जसे मळमळ, थकवा आणि एसिडिटी.
८. जर व्यक्तीने जास्त मद्यप्राशन केले असेल तर, नशा उतरवण्यासाठी नारळपाणी प्या.
९. नैसर्गिक डिटॉक्सिफायर असल्यामुळे मूत्रपिंड स्वच्छ ठेवते. किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो.
१०. त्वचेला नॅचरल ग्लो येतो आणि कोरडेपणा कमी होतो. केसांच्या मजबुतीसाठी आणि टाळू आरोग्यासाठी उपयुक्त.
११. अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीव्हायरल गुणधर्म असल्यामुळे संसर्गापासून बचाव करते.
हे अति महत्वाचे नारळाच्या पाण्याचे शरीरासाठी आरोग्यदायी फायदे आहेत. नियमितपणे नारळाचे पाणी पिल्यास शरीर तंदुरुस्त आणि ऊर्जावान राहते. जर तुम्ही यापेकी आजाराने ग्रस्त असतील तर न विसरता नारळाच्या पाण्याचे सेवन करत चला.
जर तुम्ही बाहेर यात्रा करत असाल आणि जर तुम्हाला नारळाचे पाणी उपलब्ध नाही झाले तर, थोड्या काळासाठी ऑनलाइन मागू शकता. फ्रेस ऑटर
हे ब्लॉग्स सुद्धा वाचा
धुम्रपान करीत नसाल, तरीही घातक परिणामांना सामोरे जावे लागेल
दिवसाचा हेल्दी दिनक्रम असा ठेवा : हेल्दी डेली रुटीन
आल्याचा आहारात आणि आजारात होणारे चमत्कारिक फायदे