बसताना कशा प्रकारे बसावे यासाठी विशेष निर्देश दिले आहेत. कारण बसताना आपल्या पाठीच्या खालील भागातील चकत्यावर खूप जास्त दबाव पडतो. त्यामुळे पाठ आणि मान यांना त्रास त्रास होऊ शकतो. आणि तो होऊ नये म्हणून कसे बसावे या बद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे.
बसताना ही काळजी अवश्य घ्या
१. ताठ बसून शरीर सैलसर ठेवा.
२. पाय फरशीवर आराम मुद्रेत असायला हवेत.
३. तुमची पाठ किंवा मान पुढील बाजूस झुकलेली असता कामा नये.
४. खुर्चीवर ताठ बसा, जेणेकरून पाठीच्या खालील भागातील गोलाकार त्याच्या नैसर्गिक मुद्रेत राहतील.
५. आराम खुर्चीवर बसण्याने पाठीवर दुष्परिणाम होतो. कारण अशा खुर्चीत आपली पाठ अर्धवर्तुळाकार
आकारात मुडते. यामुळे सांधे, अस्थि बंधक तंतू आणि मांसपेशीमध्ये समस्या निर्माण होते.
६. हात सहजपणे टेबलावर किंवा मांडीवर ठेवावेत. पाय क्रॉस करून बसण्याऐवजी दोन्ही पाय सरळ ठेवा.
७. दीर्घकाळ एकाच स्थितीत बसू नका, अधूनमधून हलचाल करा. पाठीच्या स्नायूंना आराम मिळावा यासाठी
अधूनमधून ताणून घ्या.
८. बसण्याच्या चुकीच्या सवयी टाळण्यासाठी हलक्या स्ट्रेचिंगचा सराव करा. योग्य पोस्चर ठेवण्याची सवय लावा.
९. पाठीला आधार मिळेल अशा पद्धतीने बसा. पाठ वाकडी किंवा खूप पुढे झुकलेली नसावी. दोन्ही पाय
योग्यरित्या जमिनीला टेकलेले असावेत.
मित्रानो.. या बेसिक गोष्टी आहेत. तुम्ही जर या गोष्टी फॉलो करत गेलात तर, आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला फायदेशीर ठरतील.
हे ब्लॉग्स सुद्धा वाचा