कपडे जास्त टिकावेत म्हणून कोणती काळजी घ्यावी ?

SD &  Admin
0

वीन कपड्यांचे सगळ्यांनाच आकर्षण असते. कारण ते चमकदार दिसतात. चार चौघात उठुन दिसतात. परंतु तेच कपडे जेव्हा एक दोनदा घालून झाल्यानंतर धुण्यासाठी देता, तेव्हा त्याचा कलर उतरला जातो. त्याची चमक कमी होते.

अनेकजण असे कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकतात. परंतु योग्य ज्ञान नसल्यामुळे कपड्यांचा रंग उतरला जातो. कधी कधी विरुद्ध रंगाचे कपडे एकत्र टाकल्यामुळे चांगल्या कपड्यांना रंग लागला जातो. आणि मग कपडे खराब दिसू लागतात.

नवीन किंवा जुने कपडे चांगले चमकदार दिसावे आणि ते अधिक काळ टिकावे म्हणून काही बेसिक केअर टिप्स फॉलो करायच्या असतात. त्या बद्दल आपण जाणून घेऊया.

कपडे जास्त टिकावेत म्हणून कोणती काळजी घ्यावी ?

थोडीशी केअर वाढवील कपड्यांचे आयुष्य 

लक्षपूर्वक धुवा 

कपडे धुवताना विशेष काळजी घ्यायची असते. कपडे नेहमी उलटे करुन धुवावेत. जेणेकरून कपड्याचा रंग उडणार नाही. त्याबरोबर कपडे ब्लीच करू नयेत. ब्लीच केल्यामुळे कपडे कमकुवत होतात. जर कपड्यांना पिवळटपणा आला असेल तर, त्या जागी लिंबाचा रस लावावा. व त्यानंतर अर्धा तास थंड पाण्यात ठेवावेत.

डागाकडे लक्ष द्या

कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकण्यापूर्वी त्यावर पडलेले डाग हातानी काढून घ्या. कारण वॉशिंग मशीनमध्ये डाग लागलेले कपडे टाकल्यास डाग अधिक गडद होतो. तसेच रंगीत कपडे सुर्प्रकाशात वाळवू नयेत. कपड्यांचा रंग फिकट होऊ शकतो.

सर्फ व साबण जास्त वापरू नका

कपडे धुवण्यासाठी सर्फ किंवा साबण जास्त वापरत असाल तर, कपड्यांच अधिक नुकसान होईल. कपड्यांची चमक तर निघून जाईलच, बरोबर कपडे फाटण्याची शक्यता अधिक असते.

खूप गरम पाणी वापरू नये

खूप गरम पाण्यात कपडे धुवू नयेत , अन्यथा ते आकसू शकतात. कपडे अधिक काळ टिकू शकणार नाही.

डिटरजंट योग्य निवडा

डिटरजंट वापरण्यापूर्वी हे निवडा की पावडर वापरायची आहे की लिक्विड डिटरजंट. कारण असे की, जर तुम्ही थंड पाण्यात कपडे धुवणार असाल तर, पावडर लगेच विरघळत नाही. आणि जर  वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवणार असाल तर, डिटरजंट असे निवडा जे फक्त वॉशिंग मशीनमध्ये धुवाण्यासाठी वापरात येते.

इस्त्री आणि स्टोरेजची काळजी घ्या


योग्य तापमानावर इस्त्री करा - गरम इस्त्रीमुळे नाजूक कपडे खराब होऊ शकतात. लेबलप्रमाणे तापमान ठेवा.

योग्य प्रकारे फोल्ड करा - फोल्डिंग नीट केल्यास सुरकुत्या पडत नाहीत आणि कपडे चांगले टिकतात.

लाकडी किंवा कापडी हँगर वापरा - प्लास्टिक आणि धातूच्या हँगरमुळे काही कपडे लवकर लोंबतात आणि खराब होतात.

नैसर्गिक कीटकनाशक वापरा - लवंग, कडुलिंबाची पाने किंवा सेंद्रिय नाफ्थलीन बॉल्स वापरल्यास कीटक लागणार नाहीत.


वाळवण्याची योग्य पद्धत वापरा

थेट उन्हात वाळवू नका - उन्हात जास्त वेळ कपडे ठेवल्यास रंग फिका पडतो. सावलीत किंवा उलटे करून वाळवा.

ड्रायरचा कमी वापर करा - ड्रायरचा जास्त वापर केल्याने कपड्यांचे तंतू लवकर खराब होतात. शक्यतो हवेने सुकू द्या.

ओलसर कपडे लवकर सुकवा - ओलसर राहिल्यास दुर्गंधी आणि बुरशी येऊ शकते.


या काही प्रभावी आणि समजण्यायोग्य टिप्स आहेत. त्या तुम्ही कपडे वापरताना नक्कीच ध्यानात ठेवा.


आम्ही काही कपड्यांची काळजी घेणाऱ्या वस्तू रेफर करत आहोत. आवडल्यास नक्कीच वापरून बघा

डेली वापरण्यायोग्य डिटरजंट - Daily use detergent

कापडी हँगर  -  Cloth hanger

क्लोथ ड्रायर - Clothes dryer






हे ब्लॉग्स सुद्धा वाचा


निरोगी घरासाठी हेल्पफुल टिप्स : बेस्ट किचन ड्रेनेज क्लीन टिप्स 






टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!